सफाई कामगाराचा नाशिकरोडला मृत्यू

By Admin | Updated: September 8, 2015 23:33 IST2015-09-08T23:32:22+5:302015-09-08T23:33:35+5:30

सफाई कामगाराचा नाशिकरोडला मृत्यू

Cleaner worker dies Nashik Road | सफाई कामगाराचा नाशिकरोडला मृत्यू

सफाई कामगाराचा नाशिकरोडला मृत्यू

नाशिकरोड : सौभाग्यनगर परिसरात मंगळवारी सकाळी साफसफाईचे काम करत असताना चक्कर येऊन पडलेल्या मनपा सफाई कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा सफाई कामगार तुषार सुनील शिंदे (२८, रा. विहितगाव हा मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे सौभाग्यनगर भागात झाडू मारून साफसफाईचे काम करत होता. यावेळी तो चक्कर येऊन पडल्याचे सामाजिक कार्यकर्ते युवराज अरिंगळे यांच्या लक्षात आले. अरिंगळे यांनी तातडीने सदर बाब सफाई विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. स्वच्छता मुकादम बाळू जाधव यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्ध पडलेल्या सफाई कामगार तुषार शिंदे याला बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. डॉक्टरांनी तपासून प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील अधिक उपचाराकरिता शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना दुपारी १२.३०च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आजी, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. तीन वर्षांपूर्वीच तुषार हा मनपा सेवेत दाखल झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Cleaner worker dies Nashik Road