स्वच्छ भारत; स्वच्छ स्थानक
By Admin | Updated: February 15, 2017 00:21 IST2017-02-15T00:21:30+5:302017-02-15T00:21:44+5:30
नाशिकरोड : हॅँड फाउंडेशनने पालटले परिसराचे रूप

स्वच्छ भारत; स्वच्छ स्थानक
नाशिकरोड : देशाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत, स्वच्छ स्थानक, नाशिकचा कुंभमेळा, महिलांची सुरक्षा, व्यसनापासून दूर रहा, रेल्वेचे नियम पाळा, बालमजुरांवर होणारा अन्याय, लेक वाचवा.. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, दादासाहेब फाळके, लष्करी जवान अशा विविध चित्रांतून नाशिकची ओळख सांगणारी ग्राफिटी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर हॅँड फाउंडेशनने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर साकारल्याने रेल्वे स्थानकाचे रूपच पालटले आहे. हॅँड फाउंडेशनने व्हॅलेंटाइन डे ला परदेशी संस्कृतीचे आक्रमण रोखण्यासाठी विविध महाविद्यालय, शाळांतील विद्यार्थी, चित्रकार यांना एकत्रित करून यंदा नाशिकरोड रेल्वेस्थानकावर ग्राफिटीच्या माध्यमातून नाशिकची महती देशभरात समजावी म्हणून मंगळवारी उपक्रम राबविण्यात आला. ग्राफिटीच्या माध्यमातून रेल्वेस्थानकाची दर्शनी भिंत, नवीन आरक्षण कार्यालयामागील रस्ता, प्लॅटफॉर्म क्रमांक १, दोन्ही पादचारी पूल आदि ठिकाणी नाशिकची महती सांगणारे विविध चित्रे ग्राफिटीच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर विद्यार्थ्यांनी साडेचार हजार चौरस फूट भिंतीवर ग्राफिटीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देणारी व नाशिकची महती सांगणारी चित्रे रंगविली आहे. (प्रतिनिधी)