‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’
By Admin | Updated: October 3, 2014 01:23 IST2014-10-03T01:22:46+5:302014-10-03T01:23:03+5:30
‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’

‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’
सिन्नर : शहर तालुक्यातील विविध संस्थांच्या विद्यालयांमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांची जयंती संयुक्त पद्धतीने उत्साहात पार पडली. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यात ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ या अभियानास उत्साहात प्रारंभ करण्यात आला. सारडा विद्यालयात : येथील ब. ना. सारडा विद्यालयात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन शाळा परिसराची स्वच्छता केली. विद्यालयातील नववी व दहावीच्या एन.सी.सी.च्या छात्रपथक व विद्यार्थ्यांनी विद्यालय ते लालचौक या भागातील गल्लीतील रस्ते झाडून स्वच्छ केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या विविध घोषवाक्यांचे फलकांनी नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जागृती केली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ केली. त्यानंतर स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे, राजू आडगावकर, दिपेश वैद्य, योगेश जाधव, तौसिफ शेख, विनायक कट्यारे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक प्र. ला. ठोके, पर्यवेक्षक गोपाळ भंगाळे, माधवी पंडित आदिंसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.