‘स्वच्छ, स्वस्थ भारत अभियान’

By Admin | Updated: February 6, 2016 00:41 IST2016-02-05T23:59:33+5:302016-02-06T00:41:56+5:30

‘स्वच्छ, स्वस्थ भारत अभियान’

'Clean, healthy India campaign' | ‘स्वच्छ, स्वस्थ भारत अभियान’

‘स्वच्छ, स्वस्थ भारत अभियान’

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज आॅफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्चतर्फे आयोजित ‘स्वच्छ व स्वस्थ भारत’ अभियान राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन गवळीवाडी येथे मीराबाई बेंडकुळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, प्राचार्य सुनील अमृतकार उपस्थित होते. तसेच प्राचार्य डॉ. सुनील अमृतकार यांनी अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्ट्ये व विविध उपक्रमांची माहिती दिली. सदर कार्यक्रमास ए. एस. वेताळ, कचेश्वर बनछोडे, सदाशिव कोठुळे, महेश बनछोडे, मनोज चौघुले, संध्या परदेशी, तारगे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. कार्यक्रम अधिकारी प्रा. रावसाहेब घेगडे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास प्रा. साहेबराव बोरस्ते, प्रा. डॉ. प्रशांत पिंगळे, प्रा. ऐश्वर्या नायर, प्रा. दीपक मेने, प्रा. रोमा शर्मा व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 'Clean, healthy India campaign'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.