शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘लाव रे व्हिडीओ’ला आता ‘क्लिप’ने प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विसंगत भूमिका व्हिडीओतून जाहीर सभेत लावणाऱ्या राज ठाकरे यांच्या ‘लाव रे व्हिडीओ’ची त्यांचेच बंधू आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘ती क्लिप लावता येत असेल तर बघा’, असे म्हणत कॉपी केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विधानाविषयी राहुल गांधी काय बोलले होते ते विधान दाखवले,

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींची विसंगत भूमिका व्हिडीओतून जाहीर सभेत लावणाऱ्या राज ठाकरे यांच्या ‘लाव रे व्हिडीओ’ची त्यांचेच बंधू आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘ती क्लिप लावता येत असेल तर बघा’, असे म्हणत कॉपी केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विधानाविषयी राहुल गांधी काय बोलले होते ते विधान दाखवले, तर दुसरीकडे गिरणारे येथे झालेल्या सभेत राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील युतीच्या नेत्यांचे व्हिडीओ दाखवून वाभाडे काढले.राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात सभांचा धडा लावला असून, कठोर टीका करतानाच ते मोदी यांचे व्हिडीओ दाखवत आहेत. राज यांनी सभेच्या वेळी व्यासपीठावर लाव रे तो व्हिडीओ म्हटले की भाजप समर्थकांत अस्वस्थता निर्माण होते. परंतु हेच तंत्र आता अन्य पक्षांत वापरले जात असून, बुधवारी (दि. २५) हुतात्मा कान्हेरे मैदानात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचाच वापर केला. मी ‘लाव रे तो व्हिडीओ’ असे म्हणणारनाही, असे सांगून त्यांनी एक व्हिडीओ क्लिप लावण्यास सांगितले.  यात कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागण्यास कसे लाचार होऊ शकत होते, हेच विरोधकांचे डीएनए असल्याचे म्हणताना दिसत आहेत. यावर ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीरांविषयी अवमानकारक उद्गार काढणाºया राहुल गांधी यांच्यावर टीका केली. सावरकरांनी १४ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्यावेळी राहुल गांधी यांचा जन्मही झाला नव्हता, असा टोला लगावला.गिरणारे येथील आघाडीच्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘लाव रे व्हिडीओ’ची स्टाईल वापरली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दत्तक घेण्याच्या घोषणेचा व्हिडीओ लावून नाशिकसाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिले, असा सवाल उपस्थित केला. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा क डेवर बसलेली मुलगी चौकीदार चोर है बोलतानाचा व पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचा व्हिडीओ, त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकला चलो चा नारा देणारी घोषणा आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणांची खिल्ली उडविणारा मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ सभेत दाखविला. उद्धव ठाकरेंनी युती केल्यामुळे शिवसैनिकांना शरमेने मान खाली घालावी लागल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv Senaशिवसेना