शास्त्रीय गायनकला चिरंतन
By Admin | Updated: October 11, 2015 00:14 IST2015-10-11T00:14:34+5:302015-10-11T00:14:57+5:30
रवींद्र अग्निहोत्री : शास्त्रीय स्पर्धेचा शानदार प्रारंभ

शास्त्रीय गायनकला चिरंतन
नाशिक : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात किरणा, जयपूर घराणं प्रसिद्ध आहे. त्यामुळे आजही शास्त्रीय ख्याल गायन व उपशास्त्रीय गायनकला चिरंतन आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, असे प्रतिपादन प्रसिद्ध आॅर्गन, व्हायोलिन वादक व गायक रवींद्र अग्निहोत्री यांनी केले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन स्पर्धेचे उद्घाटन अग्निहोत्री यांच्या हस्ते करण्यात आले. केतकी भट हिने द्रुत एक तालात ‘शंकरा’ रागातील ख्याल सादर करीत श्रवणीय अशा स्पर्धेचा प्रारंभ केला. त्यानंतर सानिका पूजाधिकारी, हर्षा पाटील यांनी सुरेख ख्याला गायन केले. मकरंद हिंगणे, पंडित उपेंद्र भट्ट व आशालता करलीकर हे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. विविध रागदारीतील ख्याल गायनासाठी नितीन वारे, नितीन पवार, प्रमोद भडकमकर, सतीश पेंडसे (तबला), तर दिव्या जोशी, प्रसाद गोखले, आशिष रानडे, सुभाष दसककर (संवादिनी) यांनी साथ दिली.