नगाव-चंदनपुरी शिवारात हाणामारी
By Admin | Updated: November 10, 2015 00:02 IST2015-11-10T00:02:13+5:302015-11-10T00:02:56+5:30
नगाव-चंदनपुरी शिवारात हाणामारी

नगाव-चंदनपुरी शिवारात हाणामारी
मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी व नगाव यांच्या वेशीवर आज सकाळी साडेअकरा वाजता दोन कुटुंबात शेतवाट्यावरून हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार देण्यात आल्या आहेत. यात भाऊसाहेब विश्वनाथ वाघ (४२) रा. नगाव शिवार यांनी तक्रार दिली आहे. ज्ञानेश्वर रंगनाथ वाघ, रंगनाथ वाघ, विजय वाघ, समाधान वाघ, यशोदाबाई वाघ, संगीता वाघ, वंदाबाई वाघ व जयश्री वाघ सर्व रा. चंदनपुरी शिवार यांनी शेतीत पिलर का चालविला अशी कुरापत काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर समाधान रंगनाथ वाघ यांनी तक्रार दिली आहे. तहसीलदारांनी दोन महिन्यांपूर्वी काढून दिलेल्या रस्त्यावरून खताचे ट्रॅक्टर घेऊन जात असताना भाऊसाहेब वाघ, भिकन वाघ, निवृत्ती वाघ, विठोबा वाघ, म्हालणबाई वाघ, जयवंताबाई वाघ, मनीषा वाघ सर्व रा. चंदनपुरी शिवार यांनी ट्रॅक्टर घेऊन जाऊ नकोस अशी कुरापत काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी किल्ला पोलिसांनी दोन्ही तक्रारी वरुन गुन्हा दाखल केला आहे. तपास जमादार रतिलाल राठोड करीत आहेत.