दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

By Admin | Updated: April 1, 2017 02:01 IST2017-04-01T02:01:43+5:302017-04-01T02:01:55+5:30

नाशिक : भारत स्टेज फोर या मानकाशी सुसंगत नसलेल्या म्हणजेच भारत स्टेज थ्री (बीएस-थ्री) इंजिन असलेल्या सर्व वाहनांवर बंदी घालण्यात आल्याने ही वाहने १ एप्रिलपासून बंद झाली आहेत.

Clash of customers for the purchase of two bikes | दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

नाशिक : भारत स्टेज फोर या मानकाशी सुसंगत नसलेल्या म्हणजेच भारत स्टेज थ्री (बीएस-थ्री) इंजिन असलेल्या सर्व वाहनांवर बंदी घालण्यात आल्याने ही वाहने १ एप्रिलपासून बंद झाली आहेत. अशा वाहनांवर दहा ते वीस हजारांची सूट देत गुरुवारनंतर शुक्रवारीही शहरातील सर्वच शोरूममध्ये वाहने विक्री करण्यात आल्याने दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. शहरात गुरुवारी सायंकाळपर्यंत मोठ्या वाहनांची विक्री झाल्यानंतर शुक्रावारीही ग्राहकांनी बीएस ३ वाहनांच्या खरेदीसाठी गर्दी केली. या वाहनाचे कोणत्याही परिस्थितीत शुक्रवारी रजिस्ट्रेशन होणे बंधनकारक आहे, असे झाले नाही तर ही वाहने भंगारमध्ये जाणार आहेत.  भारत स्टेज फोर या मानकाशी सुसंगत नसलेल्या म्हणजेच भारत स्टेज थ्री (बीएस थ्री) इंजिन असलेल्या सर्व वाहनांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे. त्यामुळे यातारखेनंतर बीएस थ्री इंजिन असलेले वाहन विकता येणार नाही. कोणी विकलेच तर त्याचे आरटीओ कार्यालयात रजिस्ट्रेशन केले जाणार नाही. हे वाहन भंगारच होणार आहे. त्यामुळे दुचाकीची निर्मिती करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी गुरुवारी (दि.३०) अशा वाहनांवर भरघोस डिस्काउंट जाहीर केले. यात दहा ते वीस हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात आली असून, ही योजना शुक्रवारीही कायम ठेवल्याने शहरात शुक्रवारी सकाळी शोरूम उघडल्यानंतर अर्धा ते पाऊण तासातच बीएस तीन वाहनांचा तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर विविध वितरकांनी एकाकडून दुसऱ्याक डे वाहने फिरविण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे दुपारपर्यंत विविध शोरुममधील बीएस-३ ची सर्व वाहने संपल्याचे प्रकार घडले. बहुतेक वितरकांनी रोखीने वाहनविक्री केली वाहनांवर मिळत असलेल्या रोख सवलतीची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे सुमारे पन्नास ते सत्तर हजार रुपयांच्या घरात जाणाऱ्या दुचाकी वाहनांवर दहा ते वीस हजार रुपयांपर्यंत सूट मिळाल्याने अशी वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या होत्या. दरम्यान, विक्री केलेल्या दुचाकीची माहिती तातडीने आॅनलाइनवर भरण्याचे कामही शोरूम चालकाकडून करण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत शोरूम सुरू होते. दरम्यान, विविध कारणांनी पाडव्याचा मुहूर्त चुकलेल्या ग्राहकांनी या सवलतीचा भरभरून लाभ घेतला. (प्रतिनिधी)

 

Web Title: Clash of customers for the purchase of two bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.