शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

जागांचा दावा करणे म्हणजे ईव्हीएम फिक्स : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:23 IST

विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकसभेपेक्षा विधानसभेचे चित्र वेगळे असेल असे सांगून राज्यात आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी चव्हाण आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीसाठी भाजप साम, दाम, दंड भेदनीतीचा अवलंब करीत असून, महाजन यांनी जागांबद्दल बोलण्याऐवजी बॅलेट पेपरचा वापर करणार का? यावर बोलावे, असेही चव्हाण म्हणाले. आगामी विधानसभेची निवडणूक कॉँग्रेससाठी महत्त्वाची निवडणूक असणार आहे. यासाठी कॉँग्रेसकडून जोरदार नियोजन सुरू आहे. राष्टवादीशी आघाडी करण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाने तत्त्वत: मान्यता दिली असून, येत्या आठ दिवसांमध्ये जागा वाटपासंदर्भातील बैठक होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.राष्टÑवादीबरोबरच अन्य समविचार पक्षांशीदेखील आघाडी करण्याची कॉँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. अर्थात तत्पूर्वी सर्व जिल्हाध्यक्षांशी चर्चा करूनच यावर निर्णय घेतला जाणार आहे. यंदा नवीन चेहरे आणि महिलांना संधी दिली जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. येत्या ६ जुलै रोजी देशभरातून इच्छुकांचे अर्ज मागविले जाणार असल्याचेही ते म्हणाले.या निवडणुकीत प्रभावी प्रचार राबविताना राज्यातील सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक कर्जमाफीचा प्रश्न, कर्जवाटप या विषयावर आंदोलने केली जाणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत, त्याचा परिणाम राज्यांवर होणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये राष्टÑपती राजवट लागू केली म्हणजे सर्व आलबेल आहे,असे नाही. भाजपला अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत जम्मू- काश्मीरमध्ये निवडणूक होणार नाही, असा दावाही चव्हाण यांनी केला.वंचित आघाडीशी चर्चालोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचा फॅक्टर ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यावर चर्चेची जबाबदारी सोपविली असून, मनसेला सोबत घेण्याबाबत मतभेद अद्याप कायम असल्याचा खुलासाही चव्हाण यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाElectionनिवडणूक