घरकुल योजनेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By Admin | Updated: April 2, 2016 00:03 IST2016-04-01T23:23:03+5:302016-04-02T00:03:22+5:30

घरकुल योजनेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

Civic Chief Minister | घरकुल योजनेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

घरकुल योजनेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मालेगाव : मालेगाव महानगरपालिका हद्दीत आयएचएसडीपी योजनेंतर्गत वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना राबवावी, अशी मागणी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मनपा हद्दीत म्हाळदे व सायने येथे आयएचएसडीपी योजनेंतर्गत तयार झालेली व होत असलेल्या १६ हजार घरकुलांपैकी आठ हजार घरे झोपडपट्टी पुनर्वसन लाभार्थी म्हणून महापालिकेत सर्व्हेक्षण करुन नोंद करण्यात आली. उर्वरित घरांपैकी राज्यशासनाच्या २ जानेवारी २०१२ च्या शासन निर्णयातील वस्त्रोद्योग धोरणानुसार वस्त्रोद्योग क्षेत्रातील जॉबर, वायफर, सायजर व इतर यंत्रमाग कामगारांसाठी घरकुले उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी भुसे यांनी यशवंतराव चव्हाण मालक, कामगार जॉबर, वायफर, सायजर युनियनच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली.

Web Title: Civic Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.