नागरी बॅँकांना १०० कोटींची आवश्यकता
By Admin | Updated: November 15, 2016 02:38 IST2016-11-15T02:37:26+5:302016-11-15T02:38:12+5:30
नागरी सहकारी बॅँक संघटनेची मागणी

नागरी बॅँकांना १०० कोटींची आवश्यकता
नाशिक : जिल्ह्यातील ४४ नागरी सहकारी बॅँकांमध्ये ३१ मार्च २०१६ अखेर साडेपाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून, मागील तीन दिवसांत अंदाजे ७०० कोटींची भर पडली आहे. त्यामुळे ग्राहकांना तातडीने देण्यासाठी जिल्ह्यातील नागरी बॅँकांना तातडीने १०० कोटींची आवश्यकता असल्याची मागणी दी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅँक्स असोसिएशनने केली आहे.
गेल्या चार दिवसांपासून नागरी सहकारी बॅँका नवीन नोटा मिळण्याबाबत त्यांच्या बॅँकेचे खाते असलेल्या राष्ट्रीयिकृत बॅँकांच्या संपर्कात आहेत. गेल्या चार दिवसांत नागरी सहकारी बॅँकांना राष्ट्रीयिकृत बॅँकांकडून मिळालेली रक्कम केवळ १५ ते २० कोटींची आहे.
नवीन जमा झालेल्या ७०० कोटींच्या प्रमाणात ग्राहकांना अजून १०० कोटी देण्याची नितांत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाच्या नवी मुंबई करन्सी चेस्टमधून रुपये १०, २०, ५०, १०० च्या नोटा असलेला रविवारी(दि.१३) नाशिकला आल्याचे समजते. (प्रतिनिधी)