शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

शहराचा पारा १० अंशावर घसरला; नाशिककरांना भरली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:29 IST

मंगळवारी किमान तपमान १० अंश इतके नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता पुन्हा अनुभवयास येत आहे.

ठळक मुद्देनाशिकच्या निफाडमध्ये मंगळवारी ९.८ अंश मंगळवारी किमान तपमान १० अंश

नाशिक : शहराच्या किमान तपमानाचा पारा मंगळवारी (दि.१९) अचानकपणे १२ अंशावरून थेट १० अंशापर्यंत घसरला. ओखी वादळानंतर शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून किमान तपमानाचा पारा पंधरा ते बारा अंशाच्या जवळपास राहत होता; मात्र मंगळवारी पारा खाली घसरल्याने हवेत प्रचंड गारवा जाणवला.मागील काही दिवासांपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा चढता आणि कमाल तपमानाचा पारा उतरता होता. मंगळवारी किमान तपमान १० अंश इतके नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता पुन्हा अनुभवयास येत आहे. डिसेंबरअखेर थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. नाशिकच्या निफाडमध्ये मंगळवारी ९.८ अंश इतके नीचांकी तपमान नोंदविले गेले. निफाड तालुका थंडीने गारठला असून शहरातही थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. पहाटे बोच-या थंडीमुळे फेरफटका मारणा-यांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र होते.मागील आठवड्यात शहराचे किमान तपमान १५ अंशाच्या पुढे सरकले होते. त्यानंतर हळुहळु किमान तपमानाचा पारा खाली येण्यास सुरूवात झाली; मात्र अचानकपणे रविवारी दूपारपासून ढग दाटल्याने किमान तपमानाचा १२ अंशाच्या जवळपास राहिले होते; मात्र ढगाळ हवामान कमी झाल्याने अचानकपणे मंगळवारी दोन अंशांनी पारा घसरला. हवेत प्रचंड प्रमाणात गारवा जाणवू लागला आहे. ढगाळ हवामान असले तरी संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर नाशिककरांना थंडी जाणवत होती. नाशिककरांनी पुन्हा उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. मंगळवारी सकाळपासून दिवसभर काही चाकरमान्यांनी कार्यालयांमध्येही उबदार कपडे परिधान करणे पसंत केले. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे नाशिककरांना हुडहुही भरली अहे.

टॅग्स :Nashikनाशिक