शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाढणार 640 कोविड बेड‌्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:27 IST

रुग्णसंख्या सातत्याने वाढत असतानाच बेड‌्स‌ उपलब्ध होत नसल्याचीदेखील तक्रार येत असल्याने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला अतिरिक्त बेड‌्सची व्यवस्था करण्याची सूचना मागील आठवड्यात केली होती. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय व बिटको रुग्णालयात एकूण ६४० अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

ठळक मुद्देबिटको, जिल्हा रुग्णालयात व्यवस्था : पालकमंत्र्यांनी घेतला आरोग्य सुविधेचा आढावा

नाशिक : रुग्णसंख्या सातत्याने वाढत असतानाच बेड‌्स‌ उपलब्ध होत नसल्याचीदेखील तक्रार येत असल्याने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला अतिरिक्त बेड‌्सची व्यवस्था करण्याची सूचना मागील आठवड्यात केली होती. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय व बिटको रुग्णालयात एकूण ६४० अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी नाशिकरोड येथील  बिटको रुग्णालय तसेच दुपारी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेची पाहणी केली.   यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा  आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मनपा आयुक्त प्रवीण अष्टीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.जिल्हा रुग्णालयात जादा ९० खाटाn जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वी ११० खाटांची क्षमता होती. तेथे आता ९० बेड‌्स वाढविल्याने २००  बेड‌्सची क्षमता झाली आहे. बिटको रुग्णालयात ३००,  नाशिकरोड येथील अग्निशमन दलाची इमारत व भक्तनिवास या कोविड केअर सेंटरमध्ये २५० असे एकूण ६४० अतिरिक्त बेडची वाढ करण्यात येणार आहे. n जिल्हा प्रशासनामार्फत मविप्र आणि एसएमबीटी रुग्णालय अधिग्रहीत करण्यात येणार असून, त्यांच्या माध्यमातूनही बेड उपलब्ध होतील. बिटको रुग्णालयात सिटी स्कॅन n बिटको रुग्णालयात अत्याधुनिक दर्जाचे सिटी स्कॅन मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे मशीन लवकरच रुग्णांच्या सेवेत येणार असून, दिवसभरात दोनशे रुग्णांचे स्कॅनिंग होणार आहे. तसेच बिटकोमध्ये लवकरच प्रतिदिवस पाच हजार स्वॅब तपासले जाणार असल्याची माहिती, भुजबळ यांनी दिली. n कोरोनाग्रस्त रुग्णांना योग्य उपचारांबरोबरच ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होण्यासाठी नवीन २५० लिटर क्षमतेचे २७  ड्युरा सिलिंडर मागविण्यात आले आहे. या सिलिंडरमुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणे सुलभ होणार आहे. खासगी संस्था, डॉक्टर्सला आवाहनकोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक सर्व सुविधांचे नियोजन प्रशासन आपल्यास्तरावरून करत आहे.  कोरोनासारख्या संकटकाळात खासगी डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना आपली सेवा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.व्हेंटिलेटरबाबत योग्य नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी व्हेंटिलेटर पोहोचविण्यात आले असून, १० ते १२ व्हेंटिलेटर आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आले असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बिटको रुग्णालयातील सिटी स्कॅन, एमआरआय कक्ष, कोविड कक्ष, प्रयोगशाळेस भेट दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा व अतिरिक्त वाढविण्यात आलेल्या बेडचा आढावा घेतला. कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड कक्षाचीही पाहणी केली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या