नागरी भागातील सिटी स्कॅन सेंटर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST2021-06-05T04:11:49+5:302021-06-05T04:11:49+5:30
सिटी स्कॅन सेंटर प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांच्या आदेशानंतर सील करण्यात आले. शहरातील श्यामजी नगर या रहिवासी झोनमध्ये सुरू करण्यात ...

नागरी भागातील सिटी स्कॅन सेंटर सील
सिटी स्कॅन सेंटर प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांच्या आदेशानंतर सील करण्यात आले.
शहरातील श्यामजी नगर या रहिवासी झोनमध्ये सुरू करण्यात आलेल्या सिटी स्कॅन सेंटरमध्ये सिटी स्कॅन करण्यासाठी कोरोना संक्रमित रुग्ण येतात. येथे रुग्णांना बसण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने कॉलनीतील जाण्या-येण्याच्या मार्गावर रुग्ण सामाजिक अंतर न राखता, मास्क न लावता उभे असतात, परिसरात थुंकतात, सदर सेंटरवर शासकीय नियमांचे पालनही होत नाही. येथे पार्किंगची व्यवस्था नसल्याने रुग्णवाहिका व इतर चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त उभी असतात, यामुळे येण्या-जाण्याचा मार्ग बंद होतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे निवेदन परिसरातील रहिवाशांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिले होते.
नगरपालिका प्रशासनाने घटना व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना पत्र पाठवून प्रस्तुत सिटी स्कॅन सेंटर सुरू करण्याबाबत नगर परिषदेकडे संबंधितांकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच नागरिकांच्या मागणीचा विचार करता आपण पुढील कारवाई करावी, असे पत्र पाठविले होते.
इन्फो
परवानगी नसल्याचे स्पष्ट
पालिका प्रशासनाने संबंधित बालरुग्णालयास नोटीसही पाठवली होती. मात्र, त्यांनी नोटीस न स्वीकारल्यामुळे तेथील दरवाजावर नोटीस चिकटविण्यात आली होती.
सटाणा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एन. एस. बांगर, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्यासह पालिका प्रशासनाचे अधिकारी संबंधित ठिकाणी गेले असता त्यांनी सिटी स्कॅन सेंटर सुरू करण्याबाबत परवानगीच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र संबंधित परवानगीसंदर्भातील कोणतेही कागदपत्रे दाखवू शकले नाहीत. यासंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी असल्यामुळे व परवानगी घेतल्यासंदर्भातील कोणतेही कागदपत्रे नसल्याने हे सिटी स्कॅन सेंटर सील करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी दिली.
फोटो- ०४ सटाणा सिटी स्कॅन
सटाणा येथील श्यामजी नगर या रहिवासी भागातील सील करण्यात आलेले सीटी स्कॅन सेंटर.
===Photopath===
040621\04nsk_27_04062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०४ सटाणा सिटी स्कॅन सटाणा येथील शामजी नगर या रहिवासी भागातील सील करण्यात आलेले सीटी स्कॅन सेंटर.