एरवी तरुण वाहनचालकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्णकर्कश हॉर्न वाहनांना बसविण्याची क्रेझ पाहावयास मिळत होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून ही क्रेझ आता मागे पडल्याची शंका निर्माण झाली आहे. कारण कर्णकर्कश हॉर्न आता शहर वाहतूक पोलिसांच्या कानावर मागील पाच महिन्यांत एकदाही पडला नसल्याचे ‘शून्य’ कारवाईवरून दिसते. हॉन्किंगप्रकरणी पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचे दुचाकीचालकांचा कर्णकर्कश हॉर्न लावण्याकडे कल आजही कायम आहे. मात्र, शहर वाहतूक पोलिसांनी जणू ‘कानावर हात’ ठेवल्याने कदाचित कर्णकर्कश हॉर्न कानी पडत नसावा? असा उपरोधिक प्रश्नही सूज्ञ नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.
--इन्फो--
कर्णकर्कश हॉर्न ठरतो गुन्हा
कर्णकर्कश हॉर्नचा वापर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारा ठरतो. मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७नुसार संबंधित वाहनचालक दंडात्मक कारवाईसाठी पात्र ठरतो. जानेवारीपासून मेअखेरपर्यंत हॉन्किंगप्रकरणी एकाही वाहनचालकावर कारवाई करण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर ओढावली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोनाची लाट आणि कडक निर्बंधांच्या काळातसुध्दा लोक वाहने घेऊन रस्त्यांवर मिरवत होते. कर्णकर्कश चायनामेड प्रेशर हॉर्न आजही शहरातील विविध मालवाहू वाहनांना बसविल्याचे दिसून येते. मात्र, याकडे आरटीओचे आणि वाहतूक शाखेचेही समांतर दुर्लक्ष होत आहे.
---इन्फो---
अपघाताची वाढतो धोका
कर्णकर्कश हॉर्नचा वापर अपघातांनाही निमंत्रण देणारा ठरतो. जेव्हा एखादा वाहनचालक कर्णकर्कश हॉर्न वाहन चालविताना वाजवितो, तेव्हा त्या आवाजाने अन्य वाहनचालक घाबरून वाहनावरील त्याचा ताबा सुटून अपघातही होऊ शकतो. यामुळे बेशिस्त वाहनचालकांनी आपले वर्तन सुधारत कर्णकर्कश हॉर्नचा वापर अशाच प्रकारे कायमस्वरुपी थांबविणे गरजेचे असल्याचे बाेलले जात आहे.
--इन्फो-
‘फॅन्सी हॉर्न’चा मोह आवरावा
म्युझिकल फॅन्सी हॉर्नचा मोह अजूनही काही बेशिस्त वाहनचालकांना आवरता येत नसल्याने शहरातील ३१ बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत एकूण १३ हजार रुपयांचा दंड केला आहे. यापैकी केवळ तीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या हॉर्नमुळेसुध्दा इतर वाहनचालकांचा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----
===Photopath===
210621\071721nsk_55_21062021_13.jpg
===Caption===
हॉन्किंग बंदी