शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली नगरी

By Admin | Updated: March 26, 2016 23:49 IST2016-03-26T23:40:58+5:302016-03-26T23:49:36+5:30

डीजेचा दणदणाट : शिवरायांचा जयघोष; जिवंत देखाव्यांनी वेधले लक्षं

The city of double-mindedness of Shivrajaya | शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली नगरी

शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली नगरी

 नाशिक : डीजेचा दणदणाट, ढोल-ताशांचा गजर, ‘जय भवानी... जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष, गुलालाची उधळण अन् आकर्षक विद्युत रोषणाईमध्ये बेभान होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात शिवजयंती मिरवणूक उत्साहात पार पडली.
मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग वाकडी बारव येथे शहराचे प्रथम नागरिक महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते पूजन करून प्रारंभ झाला. यामध्ये अकरा शिव मंडळांनी सहभाग घेतला होता़ त्यापैकी पाच मंडळांनी शिवरायांचे जिवंत देखावे तर सहा मंडळांनी शिवरायांचे पूर्णाकृती तथा अर्धाकृती पुतळे ठेवले होते़
या मिरवणुकीत प्रारंभी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चित्ररथ होता़ त्यापाठोपाठ स्वराज ग्रुप प्रतिष्ठान (राजीवनगर), शिवसाई फ्रेंड सर्कल (जुने नाशिक), जनता मित्रमंडळ (म्हसरूळ टेक), भोई समाज ट्रस्ट (भोई गल्ली), शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ (द्वारका), शिवसेवा मित्रमंडळ, मुंबई नाका युवक मित्रमंडळ, साईबाबा मित्रमंडळ (अशोकस्तंभ), अर्जुन क्रीडा मंडळ व आत्मविश्वास व्यायामशाळा (इंदिरानगर) असे अकरा चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी झाले होते़

Web Title: The city of double-mindedness of Shivrajaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.