शहर बस बंद, प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:07 PM2020-10-15T23:07:57+5:302020-10-16T01:58:31+5:30

(मालिका एसटी) नाशिक शहरात कोरोनामुळे आधीच प्रवासी वाहतुक करणा-या वाहनांची संख्या कमी त्यात कोणी दुचाकीवर बसवायला आणि लिफ्ट देण्यासही तयार ...

City bus closed, passenger pockets empty | शहर बस बंद, प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड

शहर बस बंद, प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड

Next
ठळक मुद्देरिक्षावर भर: शेअर व्हेईकलचा प्रयोग, कोरोनाकाळातही संकट

(मालिका एसटी)


नाशिक शहरात कोरोनामुळे आधीच प्रवासी वाहतुक करणा-या वाहनांची संख्या कमी त्यात कोणी दुचाकीवर बसवायला आणि लिफ्ट देण्यासही तयार नाही अशा स्थितीत बस बंद असल्याने नागरीकांना रिक्षा, टॅक्सी भाड्यासाठी मोठा भूर्दंड सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे हे सर्व एसटी बसचे हक्काचे प्रवासी आहेत.
शहरात कितीही खासगी प्रवासाची साधने वाढली असली तरी एसटी बसचा वापर करणारा देखील एक वर्ग आहे. हा कष्टकरी कामगार वर्ग आहे. तसेच विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग देखील आहे. विशीष्ट वेळेला बस उपलब्ध होते त्यामुळे हा वर्ग हक्काचा प्रवासी आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकाहून निघाल्यानंतर देखील अनेकांना अगदी पंचवटी, सातपूर, गंगापूर अशा सर्व ठिकाणी जाण्यासाठी बस प्रवास स्वस्त आणि रास्त प्रवासाचे साधन बस हेच आहे. मात्र, त्यांचे देखील हाल होत आहेत.
शहरातून जरा लांब जायचे तर दोन ते तीन वेळा रिक्षा बदलाव्या लागतात. सध्या तर ज्यांना रिक्षा शक्य नाही अशांनी खासगी प्रवासी साधने शेअरींगने नेणे सुरू केले आहेत. तथापि, केवळ बस सुरू नसल्याने कोरोना काळात नागरीकांना हा धोेका पत्कारावा लागत आहे.

मी आरटीओ एजंट म्हणून काम करतो. लहवीतहून थेट आरटीओत जावे लागते. बस सेवा बंद असल्याने अडचण येत आहे. यापूर्वी पन्नास ते शंभर रूपयांचा खर्च येत असे. आता सव्वाशे ते दीडशे रूपये खर्च होतात आणि वेळही खूप लागतो.
- सुदाम शिंदे, लहवीत.

मी त्रिमुर्ती चौकातून व्दारका येथे नोकरीवर जाते. परंतु बस बंद असल्याने त्रिमुर्ती चौकातून त्र्यंबक नाका आणि तेथून मग व्दारका येथे जावे लागते.त्यामुळे रिक्षाचा खर्च खूपच होतो. पूर्वी एसटी बसमुळे सोय होत होती.
- निलीमा जगदाळे, सिडको.

बस बंद असल्याने सध्या केवळ आॅटो रिक्षाचाच सहारा आहे. मात्र शेअर रिक्षात जाण्यास अडचण येथे फिजीकल डिस्टसिंगचे पालन होत नसल्याने भीती वाटते. बसमध्ये बसताना किमान अशी भीती वाटणार नाही. 
- इश्वर पाटील, इंदिरा नगर.

मुळातच कोरोना संकट काळाच्या अगोदरच महामंडळाने इंदिरा नगर परीसरातील बस फे-या कमी केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरीकांचे हाल होत होते. आता तर बस सेवा सर्व बंद आहेत, आणि दुसरीकडे सर्व काही अनलॉक होत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा विचार करायला हवा.
- सिध्देश झाजडे, राजीव नगर.

बस बंद असल्याने कामगारांना अंबड तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीत ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहे .रिक्षाने प्रवास करताना दुप्पट भाडे द्यावे लागत असल्याने कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे लवकरात लवकर शहर वाहतूक बस सुरू करणे गरजेचे आहे .
-निलेश मगर ,कामगार, सिडको.

शहर वाहतूक बस व्यवस्था बंद असल्याने रक्षाचालकांकडून अधिक भाडे आकारले जात आहे. त्यांना प्रवासी मर्यादा घालून दिल्याने त्यांचीही अडचण आहे. आधीच आहे त्या पगारात घर भागवणे कठीण झाले असताना कामावर जाताना लागणारे भाडे यातच निम्पा पगार संपून जात असल्याने कामगारांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
- अविनाश निकम, सिडको.
 

 

Web Title: City bus closed, passenger pockets empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.