सिडकोत पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: April 6, 2016 00:13 IST2016-04-05T23:37:25+5:302016-04-06T00:13:00+5:30
सिडकोत पाण्याचा अपव्यय

सिडकोत पाण्याचा अपव्यय
सिडको : शहरात अभूतपूर्व पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शहराला केवळ एकच वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्याबरोबरच पाण्याचा वापर जपून करावा यासाठी महापालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहनदेखील केले जात आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तसेच मोटारीने पाणी उपसा करणाऱ्यांच्या मोटारी जप्त करण्याची मोहीम महापालिकेने राबवून दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र पालिकेच्याच पाणीपुरवठा पाइपलाइनमधून पाण्याची गळती होत असल्याने पालिका काय कारवाई करणार असा प्रश्ननिर्माण झाला आहे. सिडकोतील त्रिमूर्ती चौक आणि रायगड चौकात सायंकाळच्या सुमारास पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. पालिकेला याबाबत कळविल्यानंतरही दुरुस्ती करण्यात न आल्याने पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. सिडकोसह इंदिरानगरातही नेहमीच पाणी गळती होत असल्याने पालिकेचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. (वार्ताहर)