नाशिकरोडला लस न आल्याने नागरिक ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:14 IST2021-05-13T04:14:55+5:302021-05-13T04:14:55+5:30

(फोटो) १२ नाशिकरोड गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून शहरात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड ...

Citizens were shocked as Nashik Road was not vaccinated | नाशिकरोडला लस न आल्याने नागरिक ताटकळले

नाशिकरोडला लस न आल्याने नागरिक ताटकळले

(फोटो) १२ नाशिकरोड गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून शहरात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लस तुटपुंजी येत असल्याने व आगाऊ माहिती मिळत नसल्याने लस घेण्यास येणाऱ्यांची मोठी फरपट होत आहे. लस केंद्रावरील डॉक्टर्स, कर्मचारी यांनादेखील आज कोणती लस व किती येणार आहे, हे वेळेवर समजत नसल्याने त्यांनादेखील नियोजन करणे अवघड होऊन गेले आहे. लस केंद्रावर तासनतास उभे राहिल्यावर कर्मचाऱ्यांकडून लस संपली आहे, असे सांगितले जाते. त्यानंतर दररोज वाद-विवाद होत आहेत. काही राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या ओळखीच्या लोकांना बळजबरीने, वशिला लावून किंवा दुसऱ्या मार्गाने आतमध्ये घुसवत असल्याने रांगेत उभे असलेले नागरिक, महिला आपला रोष व्यक्त करत आहेत.

नाशिकरोड परिसरातील मनपाच्या लसीकरण केंद्रावर बुधवारी कोणतीच लस न आल्याने सकाळपासून रांगेत उभे असलेले नागरिक, महिला, युवक, युवती यांना काही तासानंतर पुन्हा घरी जाण्याची वेळ आली. आर्टिलरी सेंटर रोड, खोले मळा येथील लसीकरण केंद्रावर ४५ वर्षांच्या पुढील पहिला किंवा दुसरा डोस घेणाऱ्यांनी जुने बिटको हॉस्पिटल, उपनगर हॉस्पिटल, जेलरोड पंचक हॉस्पिटल व सिन्नरफाटा महात्मा फुले हॉस्पिटल येथे जावे. याठिकाणी फक्त १८ ते ४५ वयोगटातील व ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्यांना लस दिली जाईल, असा फलक लावण्यात आला आहे.

Web Title: Citizens were shocked as Nashik Road was not vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.