सिडकोला डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST2021-04-20T04:14:57+5:302021-04-20T04:14:57+5:30

अवजड वाहनांना पुलावरूनच जाण्याची सक्तीची गरज नाशिक : शहरातील मुंबई नाका, द्वारका भागातून जाणाऱ्या मोठ्या मालवाहू ट्रकमुळे अपघाताचा धोका ...

Citizens suffer due to increase in the incidence of mosquitoes in CIDCO | सिडकोला डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त

सिडकोला डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त

अवजड वाहनांना पुलावरूनच जाण्याची सक्तीची गरज

नाशिक : शहरातील मुंबई नाका, द्वारका भागातून जाणाऱ्या मोठ्या मालवाहू ट्रकमुळे अपघाताचा धोका अधिक असल्याने त्यांना पुलावरूनच जाण्याची सक्ती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात व्यावसायिक इमारती, शाळा, महाविद्यालये, कार्यालयांना जाणाऱ्या वाहनचालकांची सतत धावपळ असते. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असल्याने अवजड वाहनांना पुलावरूनच जाण्याची सक्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे.

अद्यापही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मागणी

नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवर अद्यापही बेशिस्तपणे फिरणाऱ्या नागरिकांवर दिवसरात्र कठोर कारवाईची गरज आहे. घराजवळच्या परिसरात, लहान मोठ्या कॉलन्यांमध्येदेखील मास्कदेखील न घालता अनेक नागरिक रस्त्यावरून वावरत आहेत. या बेशिस्त नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

मास्क अर्धवट घालून भ्रमंती

नाशिक : कोरोनाचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणात होत असूनही अनेक नागरिक घराबाहेर वावरतानादेखील मास्कचा केवळ देखावा करीत आहेत. मास्क केवळ तोंडावर अर्धवट ठेवून वावरत आहेत. मास्कने नाक आणि तोंड दोन्ही झाकणे बंधनकारक आहे, याची जाणीवदेखील अशा नागरिकांना करून देण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Citizens suffer due to increase in the incidence of mosquitoes in CIDCO