‘झाडे वाचवूया’ मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST2021-06-09T04:18:05+5:302021-06-09T04:18:05+5:30
नाशिक : जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने ‘झाडे वाचवूया’ मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. नाशिकरोडच्या शिखरेवाडी परिसरातील उद्यानालगत दुतर्फा रस्त्यावर हा ...

‘झाडे वाचवूया’ मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद !
नाशिक : जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने ‘झाडे वाचवूया’ मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. नाशिकरोडच्या शिखरेवाडी परिसरातील उद्यानालगत दुतर्फा रस्त्यावर हा उपक्रम पार पडला. यावेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मोहिमेत सहभाग नोंदवला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पिंपळ, बकुळ, बहावा अशा पाच भारतीय वृक्षांची रोपे लावण्यात आली. त्यांचे रक्षण, संवर्धन करण्याची प्रतिज्ञाही घेण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना उत्तुंग झेप संस्थेचे अध्यक्ष रोहन देशपांडे यांची होती. ‘झाडे वाचवूया’ मोहिमेला नाशिक महापालिकेचा उद्यान विभाग, पर्यावरणप्रेमी नागरिक, पर्यावरण तज्ज्ञ व परिसरातील नागरिकांचे मनापासून सहकार्य लाभले. यावेळी रोहन देशपांडे म्हणाले, बऱ्याचदा अनेक जुने वृक्ष उन्मळून पडतात. काही कारणांनी वृक्ष हलविण्याची वेळ येते. त्यांचे पुनर्रोपण करणे गरजेचे आहे. या उपक्रमाला मनपाचे उपायुक्त शिवाजी आमले, विजय गायकवाड उपस्थित होते. पर्यावरणतज्ज्ञ अश्विनी भट यांच्या सूचनेनुसार उन्मळून पडलेल्या झाडांच्या मुळांजवळ जुनी बारदाने ओली करून गुंडाळण्यात आली. या उपक्रमाचे संयोजन संजय जाधव, आदित्य कुलकर्णी, अमित शुक्ल, अक्षरा घोडके, रोहित सोनार व उत्तुंग झेप संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले.
इन्फो
झाडांचे विनामूल्य पुनर्रोपण
शहर, परिसरात अनेक झाडे जोरदार वारा, पावसाने उन्मळून पडतात. बऱ्याचदा जुने वृक्ष वाचविण्याची गरज असते. उत्तुंग झेप संस्थेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा चमू तेथे पोहोचेल. झाडांचे विनामूल्य पुनर्रोपण केले जाईल. त्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी ८३०८२५२६७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.