मोकाट श्वानामुळे नागरिकांना भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:18 IST2020-08-24T23:32:51+5:302020-08-25T01:18:36+5:30
एकलहरे : सामनगाव शिवारात मोकाट श्वानांची संख्या वाढल्याने नागरिकात व विशेषत: महिला आणि लहान बालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे श्वान रात्रंदिवस पिकांमध्ये झुंडीने भटकत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कोबी, फ्लॉवर, टमाटे, भेंडी या भाजीपाल्याचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत. या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामनगाव, एकलहरे येथील ग्रामस्थांनी केली आहे.

परिसरातील सामनगाव, एकलहरेगेट, सिद्धार्थनगर, हनुमान नगर, कन्नडवाडी, देशमुखवाडी, पहाडीबाबा नगर या परिसरातील झोपडपट्टीलगत भटक्या श्वानांचा वावर वाढल्याने रहिवाशी, शेतकरी, वीज केंद्रातील कामगार यांना जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागत आहे. सामनगावपासून एकलहरे गेटपर्यंत व सिद्धार्थनगर पासून चेमरी नंबर एकपर्यंत मोकाट श्वान झुंडीने फिरतात. या श्वानांच्या धाकाने एकलहरे वीज केंद्रातील कामगार चेमरी नंबर एकच्या गेटमधून ये- जा करीत असत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एक नंबरचे गेट काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गेट नंबर दोनचाच वापर करावा लागत आहे.गेट नंबर दोन पासून चेमरी नंबर एकच्या गेटपर्यंत सिध्दार्थनगर, हनुमान नगर, कन्नडवाडी, पेट्रोलपंप परिसरात मोकाट श्वान झुंडीने फिरतात. महापालिका हद्दीतील मोकाट श्वान एकलहरेच्या किर्लोस्कर टेकडीजवळ सोडून दिले जातात अशी नागरीकांची तक्रार आहे.