शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागरी बॅँका, पतसंस्थांच्या ठेवींना व्याजदर वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:18 IST

जिल्हा बॅँकेच्या थकबाकीदारांकडे वसुलीसाठी तगादा लावण्याबरोबरच त्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्याचे प्रयत्न केले जात असले तरी, बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीत फारसा फरक पडत नसल्याचे पाहून बॅँकेने आता ठेवी वाढविण्यावर भर दिला असून, त्यासाठी गुरुवारी जिल्हा बॅँकेत सर्वच नागरी बॅँकांची बैठक घेऊन त्यात नवीन ठेवींवर व्याजदर वाढवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे.

नाशिक : जिल्हा बॅँकेच्या थकबाकीदारांकडे वसुलीसाठी तगादा लावण्याबरोबरच त्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्याचे प्रयत्न केले जात असले तरी, बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीत फारसा फरक पडत नसल्याचे पाहून बॅँकेने आता ठेवी वाढविण्यावर भर दिला असून, त्यासाठी गुरुवारी जिल्हा बॅँकेत सर्वच नागरी बॅँकांची बैठक घेऊन त्यात नवीन ठेवींवर व्याजदर वाढवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे.बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस नागरी सहकारी पतसंस्था, बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्था, पगारदार सहकारी पतसंस्थांचे चेअरमन व कार्यकारी संचालक उपस्थित होते. व्याजदर वाढीसाठी लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे अहेर यांनी सांगितले. यावेळी बोलताना नागरी सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा यांनी नाशिक जिल्हा बँक ही आपली मदर बँक असून, बँकेने गरजेच्या वेळी आपल्याला निधी उपलब्ध करून दिलेला असल्याने ज्या बॅँकांना यापुढे निधीची आवश्यकता असेल त्यांनीच निधीची मागणी करावी, असे आवाहन केले. तर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भास्करराव कोठावदे यांनी जिल्हा बँकेत परत नव्याने ठेवी ठेवून व्यवहार पूर्ववत सुरू करावे, असे आवाहन केले.बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्हा बँकांमध्ये नाशिक जिल्हा बँकेचे नाव होते; परंतु नोटाबंदी व कर्जमाफीच्या अपेक्षेने वसुली न होऊ शकल्याने आता जिल्हा बँकेस निधीची कमतरता भासत असल्याचे सांगितले. बँकेने कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कर्ज वसुली करून लवकरच बँकेस पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू असून, लवकरच नागरी बँका व सहकारी पतसंस्था यांनी नवीन ठेवी ठेवल्यास त्यावर व्याजदर वाढविण्यासाठी विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी दत्ता गायकवाड, सुनील ढिकले, अशोक व्यवहार, जगदीश गोडसे, सुरेश पाटील, एस. एन. थोरात आदी उपस्थित होते.

टॅग्स :bankबँक