नाशिक : निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर संपला असला तरी वाढत्या तपमानामुळे एकेकाळचे गुलशनाबाद असलेले नाशिक सध्या प्रखर उन्हामुळे तापू लागले आहे. यामुळे पुढील तीन महिन्यांचा कालावधी नाशिककरांसाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. बुधवार (दि.१) ३६.४ अंशापर्यंत तपमानाचा पारा चढल्याने नाशिककर घामाघूम झाले होते.आठवडाभरापासून शहराच्या कमाल तपमानात वाढ होत असून, पारा तीस अंशांच्या पुढे स्थिरावत असल्याने नाशिककरांनाही तीव्र चटका जाणवू लागला आहे. कडाक्याच्या थंडीनंतर नाशिककरांना आता उष्मा अनुभवयास येत आहे. शहराचे वातावरण आठवडाभरात कमालीचे बदलेले असून, उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांकडून शीतपेयांना मागणी वाढत आहे. शनिवारी कमाल तपमानाचा पारा ३६.४ अंशांवर स्थिरावला होता. रविवारी आठ अंशाने वाढ झाल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. संध्याकाळी पाच वाजता वारा सुटल्यामुळे नाशिककरांना आल्हाददायक वातावरण अनुभवयास आले. नाशिककर सकाळी १० वाजेनंतर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील बाजारपेठेत अत्यल्प प्रमाणात दिसून आले. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. (प्रतिनिधी)
शहर तापण्यास सुरुवात
By admin | Updated: March 2, 2017 01:46 IST