शहरात पोलिसांचे संचलन
By Admin | Updated: February 19, 2017 00:52 IST2017-02-19T00:52:34+5:302017-02-19T00:52:46+5:30
मनपा निवडणूक : भयमुक्त वातावरणासाठी प्रयत्न

शहरात पोलिसांचे संचलन
पंचवटी : महापालिका निवडणूक भयमुक्तवातावरणात पार पडावी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी परिमंडळ १ मधील पोलीस ठाण्याच्या वतीने सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले. पोलिसांचा ताफा रस्त्यावर पाहून परिसरातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या टोळक्याने काढता पाय घेतला. परिमंडळ एकमधील पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, सरकारवाडा, भद्रकाली, मुंबईनाका, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले. सकाळी ९ वाजता डोंगरे वसतिगृह मैदान येथून पोलिस संचलनाला प्रारंभ करण्यात आला. पुढे अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सांगली बँक सिग्नल, धुमाळ पॉइंट, गामा पुतळा, दूध बाजार, द्वारका चौक, सारडा सिग्नल, मुंबई नाका, भोसला स्कूल, संत कबीरनगर झोपडपट्टी, तर दुसरीकडे पंचवटी पोलीस ठाण्यापासून सुरुवात करण्यात येऊन फुलेनगर, नवनाथनगर, मखमलाबाद नाका, क्रांतिनगर, पेठफाटा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड, तारवालानगर, मेहेरधाम, अश्वमेधनगर, घाडगे मळा, शांतीनगर, मखमलाबाद गाव, म्हसरूळ, मेरी, कळसकरनगर, हिरावाडी, आडगाव नाका, अमृतधाम चौफुली, विडी कामगारनगर, नांदूर नाका आदि भागांतून आडगाव येथे समारोप करण्यात आला. (वार्ताहर)