शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

संचलन... चित्ररथ... ध्वजारोहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:54 AM

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे शुक्रवारी (दि.२६) आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध विभागांनी संचलन केले, तर चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. सोहळ्यात परेड कमांडर विजयकुमार चव्हाण, सेकंड परेड कमांडर सुरेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

नाशिक : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे शुक्रवारी (दि.२६) आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध विभागांनी संचलन केले, तर चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.सोहळ्यात परेड कमांडर विजयकुमार चव्हाण, सेकंड परेड कमांडर सुरेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात पोलीस आयुक्तालय नाशिक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, होमगार्ड, शहर वाहतूक शाखा, वनविभाग, अग्निशामक दल, भोसला मिलिटरी स्कूलची सहा पथके, इस्पॅलिअर स्कूल, बँड पथक, भोसलाचे घोडदल, डॉग युनिट वाहन, जलद प्रतिसाद पथक आदी पथकांनी सहभाग घेतला होता. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक आणि मान्यवरांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त महेश झगडे, आदिवासी विकास आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, पोलीस विशेष महानिरीक्षक विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त डॉ. अभिषक कृष्ण, पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा आदी उपस्थित होते.‘राष्ट्र प्रथम’चा संदेश पालकमंत्री महाजन यांच्या ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्र मांद्वारे सर्व प्रकारचे भेद विसरून राष्ट्रासाठी ऐक्य कायम ठेवण्याचा संदेश देण्यात आला. समर्थ योग संस्थेने ‘योग यज्ञ’ कार्यक्र माच्या माध्यमातून योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार ड्रील सादर केले. फ्रावशी अकॅडमीच्या चित्तथरारक मल्लखांब प्रात्यक्षिकांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सारडा कन्या शाळेचे देशभक्तीपर समूह गीत, केटीएचएम महाविद्यालयाचे लोकनृत्य, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाचे लेजीम, इस्पॅलिअर स्कूलचे ढोल पथक, न्यू इरा इंग्लिश मीडियम स्कूलचे ‘बेटी बचाव’ चा संदेश देणारे पथनाट्य, म्युझिक अँड डान्स इनिशिएटीव्हचे देशभक्तीपर नृत्यदेखील वैशिष्ट्यपूर्ण ठरले. जिल्हा परिषद शाळा पेठच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याचे उपस्थितांनी कौतुक केले. चित्ररथांद्वारे संदेश सोहळ्यात विविध चित्ररथांद्वारे सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला. पंतप्रधान मातृवंदना योजना, मौखिक आरोग्य, आदिवासी संस्कृती आणि शिक्षण, पर्यावरण रक्षण, जलयुक्त शिवार, डिजिटल शाळा, स्वच्छ भारत अभियान, अवयवदान, प्रदूषण नियंत्रण, चाईल्ड लाईन, बालविवाह प्रतिबंध आदी संदेश चित्ररथांच्या माध्यमातून देण्यात आले. आदिवासी विकास विभागाचा चित्ररथ विशेष आकर्षण ठरला. या चित्ररथाद्वारे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्याबरोबरच आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती देण्यात आली. विविध पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दीपक गायकवाड, देवीदास इंगळे, शिवाजी खुळगे, शिवाजी फुगट, हेमंत बेळगावकर, बाळासाहेब लहांगे, अविनाश सोनवणे यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्य पदक प्रदान करण्यात आले. इगतपुरीचे सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, पिंपळगाव बसवंतचे पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी, मालेगाव छावणीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोलते आणि राहुल पाटील, येवला शहराचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, सटाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेशपुरी बुवा, पोलीस उपअधीक्षक पी. टी. सपकाळे यांचा पोलीस महासंचालकांच्या विशेष सेवा पदकाने गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील गुणवंत क्र ीडा मार्गदर्शक अविनाश देशमुख (रोर्इंग), गुणवंत कार्यकर्ता रवींद्र मेतकर (ज्युदो), तसेच गुणवंत खेळाडू प्राजक्ता खालकर व निकिता काळे (वेट लिफ्टिंग), राहुल पडोळ (तलवारबाजी), मयूर देवरे (शरीरसौष्ठव) यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हास्तरीय लघुउद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करणाºया मे. संजित इन्स्ट्रुमेंट्स प्रा. लि. आणि मे. भिंगे ब्रदर्स यांना सन्मानित करण्यात आले. संचलनात बीव्हीजी इंडियाच्या आपत्कालीन रुग्णवाहिका सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक