कोथिंबीर भडकली, दीडशे रुपये जुडी

By Admin | Updated: June 23, 2017 00:36 IST2017-06-23T00:35:53+5:302017-06-23T00:36:14+5:30

नाशिक : आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले असून, त्याचाच परिणाम म्हणून गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी आलेल्या कोथिंबीर मालाचा १५ हजार रुपये शेकडा, असा विक्रमी भाव मिळाला आहे

Cilantro bhadkali, one and a half bucks | कोथिंबीर भडकली, दीडशे रुपये जुडी

कोथिंबीर भडकली, दीडशे रुपये जुडी

 संदीप झिरवाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले असून, त्याचाच परिणाम म्हणून गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी आलेल्या कोथिंबीर मालाचा १५ हजार रुपये शेकडा, असा विक्रमी बाजारभाव मिळाला आहे. बुधवारी (दि.२१) कोथिंबीर १२७ रुपये प्रति जुडी दराने विक्र ी झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे गुरुवारी सायंकाळी बागुल याच शेतकऱ्याने आणलेल्या कोथिंबीरला लिलावात १५० रुपये प्रति जुडी असा बाजारभाव वर्षातील उच्चांक असल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.

Web Title: Cilantro bhadkali, one and a half bucks