शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

कोथिंबीर ९० रुपये जुडी; पालेभाज्या महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:17 PM

गुजरात राज्यासह मुंबई तसेच पुणे बाजार समितीत कोथिंबीर मालाची मागणी वाढल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरचे बाजारभाव तेजीत आले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रतिजुडीला ९० रुपये असा बाजारभाव मिळाला. कोथिंबीर पाठोपाठ मेथी ६० रुपये तर कांदापात ३६ व शेपू ३५ रुपये प्रति जुडी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.

पंचवटी : गुजरात राज्यासह मुंबई तसेच पुणे बाजार समितीत कोथिंबीर मालाची मागणी वाढल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरचे बाजारभाव तेजीत आले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रतिजुडीला ९० रुपये असा बाजारभाव मिळाला. कोथिंबीर पाठोपाठ मेथी ६० रुपये तर कांदापात ३६ व शेपू ३५ रुपये प्रति जुडी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाने दमदारपणे हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत आहे. नाशिक जिल्ह्यात कोथिंबीर मालाचे उत्पादन बऱ्यापैकी असून, दैनंदिन बाजार समितीत कोथिंबीर विक्रीसाठी दाखल होत आहे. गुजरात राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरला मागणी वाढली आहे. त्यातच परजिल्ह्यातील बाजारपेठेत कोथिंबीर कमी पडल्याने नाशिकमधून मोठ्या प्रमाणात कोथिंबीर मालाची निर्यात केली जात आहे. मुंबई पाठोपाठ पुणे जिल्ह्यातही नाशिक बाजार समितीतून कोथिंबीर निर्यात केली जात आहे. त्यामुळे परबाजारपेठेत मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत, असे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले. चालू वर्षी कोथिंबीर बाजारभावाने ९० रुपये बाजारभाव गाठला असला तरी आगामी कालावधीत उत्पादन घटले तर बाजारभाव तेजीत येण्याची शक्यता असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती