‘सीआयआय’च्या वतीने ‘स्मार्ट नाशिक’साठी स्पर्धा
By Admin | Updated: October 17, 2015 23:04 IST2015-10-17T23:02:16+5:302015-10-17T23:04:20+5:30
‘सीआयआय’च्या वतीने ‘स्मार्ट नाशिक’साठी स्पर्धा

‘सीआयआय’च्या वतीने ‘स्मार्ट नाशिक’साठी स्पर्धा
सातपूर : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नाशिक स्मार्ट सिटी साकारण्यासाठी सीआयआयच्या वतीने ‘दि नाशिक वी वॉन्ट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असून, विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती सीआयआयचे अध्यक्ष सुधीर मुतालिक यांनी दिली.
केंद्र सरकारला स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा सहभाग व्हावा. वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिकदेखील अग्रसेर असल्याने भारतीय उद्योग परिषद (सीआयआय)च्या वतीने इयत्ता आठवी ते बारावी आणि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला, व्हिडीओ, छायाचित्र, स्केचेस अशा विविध स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी २० आॅक्टोबरपर्यंत सीआयआयच्या सातपूर येथील कार्यालयात प्रत्यक्ष किंवा संकेतस्थळावर आपले साहित्य पाठवावे. विजेत्या स्पर्धकांना प्रत्येक विभागासाठी तीन पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम दहा हजार, द्वितीय सात हजार, तृतीय पाच हजार असे बक्षिसांचे स्वरूप आहे. इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष सुधीर मुतालिक, कुणाल चांगरानी, देवजित मंडळ, किथ रॉबर्ट आदिंनी केले आहे. (वार्ताहर)