महावीर जयंतीनिमित्त सिडकोत कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 00:08 IST2016-04-19T23:57:45+5:302016-04-20T00:08:45+5:30

महावीर जयंतीनिमित्त सिडकोत कार्यक्रम

Cidkot Program for Mahavir Jayanti | महावीर जयंतीनिमित्त सिडकोत कार्यक्रम

महावीर जयंतीनिमित्त सिडकोत कार्यक्रम

 सिडको : भगवान महावीर जयंतीनिमित्त महावीरांचे संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्या-साठी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यानिमित्त सिडको भागातून जैन बांधवांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा शुभारंभ आमदार सीमा हिरे व महेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सिडको भागातील जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या महोत्सवाची सुरुवात राणाप्रताप चौक येथील जैन स्थानकातून मालवकेरी सौभाग्यमलजी म.सा.यांचे शिष्य उपप्रवर्तक प्रमोदमुनीजी म.सा. यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. भगवान महावीरांचे संदेश सर्व सामांन्यापर्यंत पोहोचले जावे यासाठी जैन बांधवांच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी आमदार सीमा हिरे म्हणाल्या की, भगवान महावीर यांनी दिलेले संदेश सत्य, अहिंसा, संयम, क्षमा व तप यांचा प्रत्येकाने अंगिकरण केल्यास केवळ भारतातच नव्हे तर विश्वाचे कल्याण होईल, असे सांगितले. या मिरवणुकीत श्री वर्धमान जैन स्थानकवासी, त्रिमूर्ती चौक, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पवननगर, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, राणाप्रताप चौक आदि संघ सहभागी झाले होते. मिरवणुकीची सांगता त्रिमूर्ती चौक येथे करण्यात आली.
याप्रसंगी बाळासाहेब पाटील, नंदा चोरडिया, वैशाली नहाटा, ललिता चोरडिया, गणेश साखला, अनिल कर्नावट, राजू लोढा, राकेश ढोमसे, विजय रणाते, मनोज बिरार, प्रकाश अमृतकर, प्रकाशचंद
नहाटा आदि सहभागी झाले
होते. (वार्ताहर)

Web Title: Cidkot Program for Mahavir Jayanti