सिडकोत दुपारनंतर सर्वच दुकानांना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:23+5:302021-04-23T04:16:23+5:30
राज्यात लॉकडाऊन होण्याचे संकेत असल्याने सिडको, अंबड परिसरातील नागरिकांनी सकाळी ७ वाजेपासून भाजीबाजार, तसेच किराणा दुकानांमध्ये गर्दी केली होती. ...

सिडकोत दुपारनंतर सर्वच दुकानांना टाळे
राज्यात लॉकडाऊन होण्याचे संकेत असल्याने सिडको, अंबड परिसरातील नागरिकांनी सकाळी ७ वाजेपासून भाजीबाजार, तसेच किराणा दुकानांमध्ये गर्दी केली होती. शासनाच्या नियमानुसार भाजीबाजार व किराणा दुकान यांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश दिले असल्याने दुकानांमध्ये व भाजीबाजारातही गर्दी दिसून आली. ११ वाजेनंतर मेडिकल वगळता भाजीबाजार, तसेच किराणा दुकानेदेखील बंद झाल्याचे दिसून आले. सकाळी ११ वाजेनंतर सिडकोतील मुख्य बाजारपेठ असलेल्या पवननगर, शिवाजी चौक, तसेच त्रिमूर्ती चौक आदी बाजारांमध्ये शुकशुकाट दिसून आला. जवळपास सर्वच दुकानांना कुलूप लावलेले दिसून आले. मात्र, असे असतानाही दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची व नागरिकांची गर्दी मात्र रस्त्यावर दिसून आली.
चौकट=====
संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्य चौक, तसेच रस्त्यालगत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी पोलिसांसाठी शामियाना टाकण्यात आलेला आहे. मात्र, रिकाम्या खुर्च्यांव्यतिरिक्त एकही पोलीस याठिकाणी दिसून आला नसल्याने वाहनधारक सुसाट ये- जा करताना दिसून आले.
(फोटो २२ सिडको)