सिडकोत पुन्हा वाहन जळीत कांड

By Admin | Updated: April 1, 2016 00:08 IST2016-04-01T00:03:21+5:302016-04-01T00:08:54+5:30

दहशत : एका मोटारीसह चार दुचाकी पेटविल्या

CIDCO's vehicle burnt to death | सिडकोत पुन्हा वाहन जळीत कांड

सिडकोत पुन्हा वाहन जळीत कांड

सिडको : मध्यरात्रीच्या सुमारास सिडको परिसरातील कामटवाडे भागात समाजकंटकांनी पुन्हा रहिवाशांची वाहने पेटवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि.३१) सकाळी उघडकीस आली.
कामटवाडे, इंद्रनगरी परिसरातील इमारतींच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लावण्याचा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याने येथील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. समाजकंटकांनी पाटलीपुत्र सोसायटीच्या वाहनतळामधील गणपत दिवे यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १५, ईजे ८७४४), मुकुंद देवरे यांची दुचाकी (एमएच १५ बीव्ही ८८२८), शैलेंद्र जाधव यांच्या दुचाकीसह (एमएच १५ सीडब्ल्यू १६२७) एकूण चार दुचाकी पेटविल्या. यामध्ये दिवे यांची दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली. तसेच घराजवळच गणेश वैद्य यांची असलेली अल्टो मोटार (एमएस १५ एफएफ ०६१९) पेटविण्याचा
प्रयत्न समाजकंटकांकडून करण्यात आला.

Web Title: CIDCO's vehicle burnt to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.