सिडकोतील ‘ते’ हॉटेल कायमस्वरूपी सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:50+5:302021-07-30T04:14:50+5:30

सिडकोतील स्टेट बँक चौपाटी येथील सोनाली मटन भाकरीसमोर बुधवारी (दि. २८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास देवळाली गाव येथील प्रसाद ...

CIDCO's 'Te' Hotel is permanently sealed | सिडकोतील ‘ते’ हॉटेल कायमस्वरूपी सील

सिडकोतील ‘ते’ हॉटेल कायमस्वरूपी सील

सिडकोतील स्टेट बँक चौपाटी येथील सोनाली मटन भाकरीसमोर बुधवारी (दि. २८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास देवळाली गाव येथील प्रसाद भालेराव या तरुणाचा अनिल दशरथ पिटेकर उर्फ गिन्या, नितीन दांडेकर यासह सहा जणांनी फरशीचे तुकडे डोक्यात टाकून खून केला. संशयित अनिल पिटेकर याच्यावर सुमारे २५ हून अधिक घरफोडी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. अनिल दांडेकर व यातील अन्य संशयितावरदेखील याआधी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. या घटनेनंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी स्टेट बँक चौक येथील सोनाली मटन खानावळ सील करण्यात यावे, असे पत्र पालिकेचे विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांना दिल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी त्या हॉटेल मालकाला पाच हजार रुपये दंड करून हॉटेल ठरावीक काळासाठी सील केले.

(फोटो २९ सिडको) स्टेट बँक चौक येथे हॉटेल सोनाली मटन खानावळ मालकास दंड करून हॉटेल सील करताना मनपा अधिकारी मते, समवेत दीपक लांडगे व अन्य मनपा कर्मचारी.

Web Title: CIDCO's 'Te' Hotel is permanently sealed