शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सिडकोतील ‘त्या’ इसमाची गळा दाबून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 21:42 IST

नाशिक : सिडकोच्या कारगिल चौकातील आशीर्वाद अपार्टमेंटमधील पाच नंबरच्या फ्लॅटमध्ये पलंगावर बेशुद्ध तसेच गळ्यात बुटाची लेस गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आलेले प्रकाश गुलाब अहिरे (४८) यांचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर समोर आले आहे़ सुमारे २० दिवसांपूर्वी प्रकाश अहिरे हे घरातील पलंगावर बेशुद्धावस्थेत आढळून आले होते़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़

ठळक मुद्देकारगिल चौकातील घटना : शवविच्छेदन अहवालात स्पष्टपोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

नाशिक : सिडकोच्या कारगिल चौकातील आशीर्वाद अपार्टमेंटमधील पाच नंबरच्या फ्लॅटमध्ये पलंगावर बेशुद्ध तसेच गळ्यात बुटाची लेस गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आलेले प्रकाश गुलाब अहिरे (४८) यांचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर समोर आले आहे़ सुमारे २० दिवसांपूर्वी प्रकाश अहिरे हे घरातील पलंगावर बेशुद्धावस्थेत आढळून आले होते़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ डिसेंबर २०१८ रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास प्रकाश अहिरे हे घरातील पलंगावर बेशुद्ध तसेच गळ्यात बुटाची लेस गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले होते़ त्यांना शालक विशाल मोरे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ़ राहुल पाटील यांनी तपासून मयत घोषित केले होते़ जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रकाश अहिरे यांचे शवविच्छेदन करण्यात आले असता फोरेन्सिक एक्स्पर्ट डॉ. आनंद पवार यांनी प्रकाश अहिरे यांचा कोणी तरी गळा दाबून, तसेच मारहाण करून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़

दरम्यान, या घटनेचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंबड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून मयत अहिरे यांचे कुटुंबीय व नातलगांकडे प्राथमिक तपास केला असून, त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही़ तसेच अहिरे यांच्या नातेवाइकांनीही कोणावर संशय व्यक्त न केल्याने या खुनाचा उलगडा करण्याचे आव्हान अंबड पोलिसांपुढे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस