शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या बांधकाम परवानगीचा अडसर हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:48 IST

सिडकोमधील बांधकाम परवानगीचा अडसर आता दूर होणार आहे. गेल्या महासभेतील लक्षवेधीनुसार नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार नगररचना विभागाकडून शासनाचे लक्ष प्रस्ताव पाठवून वेधण्यात आले आहे.

नाशिक : सिडकोमधील बांधकाम परवानगीचा अडसर आता दूर होणार आहे. गेल्या महासभेतील लक्षवेधीनुसार नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार नगररचना विभागाकडून शासनाचे लक्ष प्रस्ताव पाठवून वेधण्यात आले आहे.आॅटोडीसीआर सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये सिडकोमधील बांधकाम नियमावलीचा समाविष्ट नसल्याने आॅनलाइन बांधकाम परवानगी प्रक्रियेत सिडकोमधील बांधकामाचे परवानगी अर्ज स्वीकारले जात नव्हते. त्यामुळे सिडको परिसरातील बांधकाम व्यवसाय ठप्प झाला होता. बांधकामाच्या परवानगी अर्ज प्रक्रिया आॅटोडीसीआरद्वारे आॅनलाइन पार पडत नसल्याने अडचण निर्माण झाली होती. शेकडो फाईली परवानगीच्या प्रतीक्षेत नगररचना विभागाकडे पडून आहेत. महासभेत लोकप्रतिनिधींनी याबाबत मागणी केली होती. तसेच दिलीप दातीर यांनी लक्षवेधीही मांडली होती. यानुसार शासनाचे मार्गदर्शन याबाबत घेण्यासाठी नगररचना विभागाने शहर व सिडकोची नियमावली वेगवेगळी असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. बांधकाम विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली व प्रणाली वेगवेगळी असल्यामुळे सिडकोचा आॅटोडीसीआरमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. नागरिकांनी याबाबत बांधकाम परवानगीचे अर्ज प्रकरण आॅनलाइनऐवजी आॅफलाइन स्वीकारण्यात यावे. या मागणीनुसार शासनाकडे मनपाच्या नगररचना विभागाने प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे बांधकाम परवानगीचा प्रश्न सुटणार असल्याची चिन्हे दिसत आहे.तांत्रिक अडचण सुटणारआॅटोडीसीआरनुसारच परवानगी अर्ज घ्यावेत, असे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितल्यामुळे आणि आॅटोडीसीआर प्रणालीमध्ये सिडकोचा समावेश नसल्यामुळे या तांत्रिक अडचणीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. बांधकाम परवानगी अर्ज प्रक्रिया सिडकोच्या बाबतीत ठप्प झाली आहे; मात्र लवकरच याबाबतचा आदेश शासनाकडून प्राप्त होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcidcoसिडको