सिडकोत अल्पवयीन मुलीस मारहाण
By Admin | Updated: July 10, 2017 17:18 IST2017-07-10T17:18:19+5:302017-07-10T17:18:19+5:30
अल्पवयीन मुलीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून एका तरुणाने तिला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली़.

सिडकोत अल्पवयीन मुलीस मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अल्पवयीन मुलीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून एका तरुणाने तिला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़९) सकाळच्या सुमारास सिडकोतील दत्तमंदिर परिसरात घडली़ मेघराज धनराज मोरे (२३) असे मारहाण करणाऱ्या संशयिताचे नाव असून, तो जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील भोरटेकचा रहिवासी आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित मेघराज मोरे व हेडगेवार परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत़ या युवतीस सकाळी ८ वाजेच्या सुमारास दत्तमंदिराशेजारी भेटण्यासाठी बोलावले़ यावेळी दोघांमध्ये भांडण होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले़ मोरे याने जवळच पडलेल्या लोखंडी रॉडने या मुलीला मारहाण केल्याने ती जखमी झाली आहे़
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़