शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

सिडकोत गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:29 AM

येथील वावरेनगरमध्ये संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीकडून अंबड पोलिसांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ राम अंजोर त्रिपाठी (४०, रा़ सातपूर) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून आणखी काही कट्टे व काडतुसे मिळण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी व्यक्त केली आहे़

सिडको : येथील वावरेनगरमध्ये संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीकडून अंबड पोलिसांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ राम अंजोर त्रिपाठी (४०, रा़ सातपूर) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून आणखी काही कट्टे व काडतुसे मिळण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी व्यक्त केली आहे़तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि़२९) सायंकाळच्या सुमारास वावरेनगरमध्ये एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे हेमंत आहेर व दिपक वाणी यांचे पथक पाठवून संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो सातपूर परिसरातील रहिवासी राम त्रिपाठी असल्याचे समोर आले़ त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात त्रिपाठीविरोधात भारतीय हत्यार कायदा व मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, विजय पवार, पोलीस हवालदार भास्कर मल्ले, पोलीस नाईक दत्तात्रय गवारे, दुष्यांत जोपाळे, विजय वरंदळ, अविनाश देवरे, हेमंत अहेर, पोलीस शिपाई दीपक वाणी, पोलीस नाईक चंद्रकांत गवळी, प्रशांत नागरे यांनी ही कामगिरी केली़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा