सिडकोत गुन्हेगारांचे फलक हटविले
By Admin | Updated: March 26, 2016 23:44 IST2016-03-26T23:24:35+5:302016-03-26T23:44:43+5:30
सिडकोत गुन्हेगारांचे फलक हटविले

सिडकोत गुन्हेगारांचे फलक हटविले
सिडको : शिवजयंतीनिमित्त सिडको तसेच परिसरात ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळ व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग्ज लावले असून, यात काही फलकांवर गुन्हेगारांचेही फोटो असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी रात्रीतूनच मोहीम राबवित ५० हून अधिक फलक हटविले.
सिडको तसेच परिसरात सार्वजनिक उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांची सर्च मोहीम सुरू आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून कॉम्ब्ािंग आपरेशन, तसेच तडीपार करणे अशा कारवाया कायमच सुरू असल्याने सिडकोतील गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याबरोबरच पोलिसांना शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या काही फलकांवर गुन्हेगारांचे फोटो दिसून आले. यामुळे कायदा सुव्यवस्था सुरळीत रहावा यासाठी पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्तअतुल झेंडे, अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी स्वत: व पोलीस कर्मचाऱ्यांना बरोबर घेत शुक्रवारी (दि.२५) रात्री दोन वाजेपर्यंत फिरून गुन्हेगारांचे फोटो असलेले फलक हटविले. (वार्ताहर)