सिडकोत आंबेडकर जयंती उत्साहात
By Admin | Updated: April 15, 2016 00:43 IST2016-04-15T00:26:19+5:302016-04-15T00:43:10+5:30
सिडकोत आंबेडकर जयंती उत्साहात

सिडकोत आंबेडकर जयंती उत्साहात
सिडको : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
सोमेश्वर मित्रमंडळ
सिडको हनुमान चौक येथील सोमेश्वर मित्रमंडळाच्या वतीने आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष बाळासोहब गिते यांच्या हस्ते आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जयंतीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी बाळासाहेब मोरे, संतोष घोडके, संतोष गवळी, जितेंद्र सजनुले, नारायण सावंत, उमेश गवई, गौरव पगारे, संजय अहेर, हेमंत आहिरे, राहुल पगारे, रमाकांत तरोडे, नितीन क्षीरसागर, सागर दंडगव्हाळ आदि उपस्थित होते.
सह्याद्री युवा फाउंडेशन
सह्याद्री युवा फाउंडेशनच्या वतीने सिटी सेंटर मॉल परिसर, क्रांतिनगर, संभाजी चौक, दत्त मंदिर याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आंबेडकर यांच्या पुतळ्यास मनपा माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व आरपीआयचे माजी जिल्हा अध्यक्ष किशोर घाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष रोशन घाटे यांनी केले होते. यावेळी करण गायकर, गोविंद काळे, राजाभाऊ साळवे आदिंसह भीम सैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)