आयशरच्या धडकेत सिडकोतील महिलेचा जागीच मृत्यू

By Admin | Updated: March 18, 2017 21:03 IST2017-03-18T21:03:24+5:302017-03-18T21:03:24+5:30

गतिरोधकावर आयशर वाहनाने दिलेल्या धक्क्यामुळे दुचाकीवरील वृद्ध महिला आयशरखाली पडून तिचा दुर्दैवी मृत्यू

CIDCO woman dies on the spot | आयशरच्या धडकेत सिडकोतील महिलेचा जागीच मृत्यू

आयशरच्या धडकेत सिडकोतील महिलेचा जागीच मृत्यू

सिडको : गतिरोधकावर आयशर वाहनाने दिलेल्या धक्क्यामुळे दुचाकीवरील वृद्ध महिला आयशरखाली पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उत्तमनगर सिडकोतील अभिनव शाळेच्या प्रवेशद्वारासमोर घडली़ मयत महिलेचे नाव शोभा जयप्रकाश भांबेरे (६१, एन- ४६, जेए/११/९/५, सिडको) असे आहे़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ट्रकचालक आप्पा मोतीराम बच्छाव (५३, रा़ राणाप्रताप चौक, सिडको) विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हेमंत जयप्रकाश भांबेरे (४०) व त्यांची आई शोभा या दुचाकीवरून (एमएच १५, बीटी ६४७७) घरी जात होते़ उत्तमनगरमधील अभिनव शाळेच्य प्रवेशद्वारासमोरील गतिरोधकावरून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या आयशरने (एमएच ०४, सीजी ३०६६) दुचाकीला धक्का दिला़ यामध्ये शोभा भांबेरे खाली पडल्या व आयशरच्या मागील चाकाखाली सापडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला़

Web Title: CIDCO woman dies on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.