सिडकोत समाजकंटकांचा धुमाकूळ ; सात वाहनांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 00:07 IST2021-05-17T00:07:26+5:302021-05-17T00:07:55+5:30
सिडको परिसरातील लेखानगर भागात सुंदरबन कॉलनी येथे रविवारी (दि.१६) रात्री अज्ञात समाजकंटकांनी जवळपास सहा ते सात वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.

सिडकोत समाजकंटकांचा धुमाकूळ ; सात वाहनांची तोडफोड
नाशिक : सिडको परिसरातील लेखानगर भागात सुंदरबन कॉलनी येथे रविवारी (दि.१६) रात्री अज्ञात समाजकंटकांनी जवळपास सहा ते सात वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोड करणाऱ्या तोलक्याचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेखानगर भागातील सुंदरबन कॉलनी येथे रविवारी रात्री दोन ते तीन दुचाकीवरून आलेल्या ४ ते ५ जणाच्या टोळक्याने काठया व दगडाने घरासमोर पार्किंग केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती अंबड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून
टोळक्याने अशाप्रकरे तोडफोड का केली यांच्या तपासला सुरुवात केली आहे. दरम्यान, हा प्रकार जुन्या वादातून घडल्याची परिसरात चर्चा असून वाहनाच्या तोडफोड प्रकरणात रात्री उशीरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.