सिडको, सातपूरचा पाणीपुरवठा उद्या बंद
By Admin | Updated: February 29, 2016 00:27 IST2016-02-29T00:19:56+5:302016-02-29T00:27:03+5:30
पाणी नियोजनात अल्पबदल

सिडको, सातपूरचा पाणीपुरवठा उद्या बंद
नाशिक : पाणीकपातीच्या नियोजनात दर सोमवारी बंद राहणारा सिडको-सातपूरचा पाणीपुरवठा सोमवारी सुरळीत राहणार असून, मंगळवारी मात्र या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. इतर विभागाचा पाणीपुरवठा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच बंद राहणार असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पाणीकपातीच्या नियोजनातअल्पसा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सिडकोतील प्रभाग क्रमांक ४१ ते ४९, ५१ व ५२ तसेच नाशिक पूर्ण ४ भागांतील प्रभाग क्रमांक ५३ मधील विशाखा कॉलनी, राणेनगर, चेतनानगर, किशोरनगर, रायगड उद्यान, भगतसिंगनगर, अल्को मार्केट परिसर, प्रभाग क्रमांक ५४ मधील पांडवनगरी, श्रद्धाविहार, शर्वरीनगर, नाशिक केंब्रिज शाळा परिसर तसेच प्रभाग ६१ वडनेर गेट, पिंपळगाव खांब, गणेशनगर, पोरजे वस्ती, राजपूत कॉलनी या भागातील पाणीपुरवठा सोमवारऐवजी मंगळवारी बंद राहणार आहे.
नागरिकांनी या बदलांची नोंद घ्यावी तसेच महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)