शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

सिडको मनपा विभागीय कार्यालय वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:07 IST

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या वेळात बहुतांशी सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचारी जेवणासाठी जाताना कार्यालयाची सुरक्षितता वाºयावर सोडत असून, कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे टेबलावर तशीच सोडून जाताना, कार्यालयातील विजेचे दिवे, पंखेदेखील सुरू ठेवून महापालिकेला आर्थिक नुकसान पोहोचवित आहेत.

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या वेळात बहुतांशी सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचारी जेवणासाठी जाताना कार्यालयाची सुरक्षितता वाºयावर सोडत असून, कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे टेबलावर तशीच सोडून जाताना, कार्यालयातील विजेचे दिवे, पंखेदेखील सुरू ठेवून महापालिकेला आर्थिक नुकसान पोहोचवित आहेत. अधिकारी, कर्मचाºयांच्या या बेदरकार वृत्तीचा फायदा समाजकंटकाकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकाºयांना कामावर येण्याची आणि कामावरून घरी जाण्याची वेळ निश्चित केलेली असतानाही अनेकदा कर्मचारी हे उशिराने कामावर हजर होत असल्याचे निदर्शनात आले आहे. अंबड पोलीस स्टेशनच्या समारे असलेल्या महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात प्रशासन विभाग, बांधकाम, घरपट्टी, पाणी बिल, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, विविध कर यांसह मनपाशी संबंधित कामाकाजासाठी सिडको, अंबड व पाथर्डीसह परिसरातील नागरिक येथे येत असतात. मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजता मनपाच्या सिडको कार्यालयातील विभागीय अधिकाºयांचे दालन असलेल्या प्रशासन विभाग, घरपट्टी विभाग, विविध कर मिळकत विभाग (अतिक्रमण), पाणीपुरवठा विभाग आदी विभागांतील दालनांमध्ये अधिकारी अथवा कर्मचारी हे जेवणाच्या सुटीत बाहेर गेलेले असताना या दालनातील लाइट सुरूच असल्याचे दिसून आले. याच दालनांमध्ये महत्त्वाची कागदपत्रे टेबलावर ठेवण्यात आलेली असताना कामकाज करण्यासाठी येणारे नागरिक या दालनांमध्ये सहज मुक्त संचार करताना दिसून येत होते. या दालनातील टेबलांवर महत्त्वाचे कागदपत्र ठेवलेले असताना जेवणाच्या सुटीच्या वेळात या दालनांमध्ये एखादा कर्मचारी असणे गरजेचे असतानाही कर्मचारी आपल्याच कार्यालयाबाबत बेफिकीर असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे.मनपाच्या सर्वच दालनातील कागदपत्रे ही नागरिकांच्या कामाशी निगडीत असून, महत्त्वाची आहे. यामुळे दालनातून बाहेर जाताना अथवा जेवणाच्या सुटीच्या वेळात याठिकाणी एखादा कर्मचारी असणे गरजेचे आहे. परंतु जेवणाच्या सुटीच्या वेळात दालनात एकही कर्मचारी हजर राहत नसल्याने ही गंभीर बाब आहे. याबाबत विभागीय अधिकाºयांना जाब विचारणार असून, यापुढील काळात यात सुधारणा करणार.  - हर्षा बडगुजर, सभापती,  सिडको विभाग

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcidcoसिडको