सिडकोतील घरफोडीत दागिने लंपास
By Admin | Updated: November 1, 2015 23:02 IST2015-11-01T23:01:16+5:302015-11-01T23:02:21+5:30
सिडकोतील घरफोडीत दागिने लंपास

सिडकोतील घरफोडीत दागिने लंपास
नाशिक : बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले. माहरवाडीतील रहिवासी अमोल कोळपकर यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेले २७ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरून नेले़ (प्रतिनिधी)