सिडकोत तिघा संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: October 17, 2015 23:36 IST2015-10-17T23:35:59+5:302015-10-17T23:36:58+5:30

सिडकोत तिघा संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

CIDCO filed a ransom case against three suspects | सिडकोत तिघा संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

सिडकोत तिघा संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

सिडको : दुकान चालवायचे असेल तर दरमहा पाचशे रुपये द्यावे लागतील अशी धमकी देणाऱ्या तिघा संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गणेशचौकातील अयोध्या मार्केटमध्ये लीलाधर गवळी यांचे मेडिकल दुकान आहे़ बुधवारी (दि़१४) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ते दुकानासमोर उभे असताना संशयित धनाजी गायकवाड, सुरेश झाडे व शंकर दांडेकर (रा़ इंदिरा गांधी वसाहत) हे तिघे दुचाकीवर आले़ यातील गायकवाडने मेडिकल दुकान सुरू ठेवायचे असेल तर दरमहा पाचशे रुपये द्यावे लागतील असे बोलत शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली़, अशी तक्रार आहे. या प्रकरणी या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: CIDCO filed a ransom case against three suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.