विद्युत वाहिनीच्या धक्क्याने सिडकोतील तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: December 7, 2015 00:05 IST2015-12-07T00:04:46+5:302015-12-07T00:05:17+5:30

विद्युत वाहिनीच्या धक्क्याने सिडकोतील तरुणाचा मृत्यू

CIDCO death due to electric shock | विद्युत वाहिनीच्या धक्क्याने सिडकोतील तरुणाचा मृत्यू

विद्युत वाहिनीच्या धक्क्याने सिडकोतील तरुणाचा मृत्यू

सिडको : झाडावरील पतंग काढण्याच्या प्रयत्नात उच्चदाब वाहिनीचा धक्का लागून महाराणा प्रताप चौकातील सागर रामदास सिरसाठ (२५) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, आठ दिवसांपूर्वी उच्चदाब वाहिनीचा धक्का लागून दत्त चौकातील एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील महाले फार्मजवळील लक्ष्मीनगर येथील विमल रो-हाऊसमधील रहिवासी सागर सिरसाठ हा रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घराजवळील झाडावर अडकलेला पतंग काढत असताना उच्चदाब विद्युत वाहिनीचा धक्का लागल्याने जखमी झाला़ त्यास त्याचे काका श्याम सिरसाठ यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ़ राहुल पाटील यांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, सिडको परिसरात अनेक ठिकाणी उच्चदाब वीजवाहक तारा उघड्या असून, यापूर्वीही अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे़

Web Title: CIDCO death due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.