नाशिक : परिसरातील पाटील नगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा सचिन अहिरे (२४, रा. पाटील नगर, सिडको) या विवाहित महिलेने गुरुवारी (दि.२५) राहत्या घरी किचन मध्ये पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या महिलेला त्रिमूर्ती चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित करत जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. यावेळी तिच्या जवळ चिठ्ठी सापडल्याने तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. तसेच मिळालेल्या चिठीच्या आधारे मयत महिलेचा भाऊ कमलेश जाधव याने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत वर्षाच्या सासरच्या लोकांनी वर्णभेद करातनाच तुला स्वयंपाक बनवता येत नाही अशा विविध कारणांनी मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला असून घर बांधण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी केली जात होती. या सर्व प्रकारामुळे वर्षा हिने आत्महत्या केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात महिलेचा घातपात झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी करत अंत्यविधीनंतर या संदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी (दि.२६) या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
विवाहीतेच्या आत्महत्या प्रकरणात पतीसह पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:28 IST
नाशिकच्या सिडको परिसरातील पाटील नगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
विवाहीतेच्या आत्महत्या प्रकरणात पतीसह पाच जणांवर गुन्हा
ठळक मुद्देविवाहिता आत्महत्या प्रकरणात सासरचे अडचणीतमाहेरच्यांनी व्यक्त केला घातपाताचा संशय