सिडको ब्लॉक कॉँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर

By Admin | Updated: August 21, 2016 01:42 IST2016-08-21T01:42:14+5:302016-08-21T01:42:25+5:30

सिडको ब्लॉक कॉँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर

The CIDCO Block Congress released the Jumbo Working Committee | सिडको ब्लॉक कॉँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर

सिडको ब्लॉक कॉँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर

 सिडको : सिडको ब्लॉक कॉँग्रेसची जम्बो कार्यकारिणी शहराध्यक्ष शरद अहेर यांच्या आदेशान्वये जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीत सर्वांना संधी देण्यात आल्याचे ब्लॉक अध्यक्ष मीरा साबळे यांनी सांगितले.
सिडको ब्लॉक कॉँग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात १२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, ११ चिटणीस, ११ प्रभाग अध्यक्ष याप्रमाणे पदाधिकारी व प्रभाग अध्यक्षांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या उपाध्यक्षपदी डॉ. प्रशांत आंबरे, सुरेश जाधव, धोंडीराम बोडके, संतू पाटील जायभावे, अशोक गुळवे, विठ्ठल फड, दिलीप सोनवणे, पंढरीनाथ कांगणे, डॉ. विश्वनाथ सोनवणे, माणिक जायभावे, वैशाली सोनवणे, कमलेश येवले, सरचिटणीसपदी संजय कोथमिरे, अजय घुगे, रामभाऊ तिडके, हितेंद्र ब्राह्मरक, मधुकर सानप, विष्णू शेळके तसेच खजिनदार शशीकांत दाणी त्याचप्रमाणे चिटणीसपदी हेमंत पवार, किसनराव कुडके, धोंडीराम देवरे, रवींद्र खांबेकर, कमलेश जैन, कुणाल डोंगरे, ओंकार निकुंभ, बाळासाहेब साळवे, मुमताज पटेल, मनीषा जमदाडे, मीना भारस्कर यांची, तर ब्लॉक विधानसभा युवक कॉँग्रेस अध्यक्ष मुन्ना ठाकूर, महिला ब्लॉक अध्यक्ष चारुशीला शिरोडे, एन.एस.यू.आय. सुरज चव्हाण आदिंची निवड करण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, प्रदेश चिटणीस हेमलाता पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The CIDCO Block Congress released the Jumbo Working Committee