सिडको परिसरातील तडीपारास अटक
By Admin | Updated: September 2, 2016 23:09 IST2016-09-02T23:09:24+5:302016-09-02T23:09:36+5:30
सिडको परिसरातील तडीपारास अटक

सिडको परिसरातील तडीपारास अटक
नाशिक : शहर व जिल्ह्यातून तडीपार असतानाही शहरात वावरणारा सराईत गुन्हेगार गणेश शेषराव घुसळे (रा. उपेंद्रनगर, सिडको) यास गुन्हेशाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ घुसळेवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्यास आॅक्टोबर २०१५ मध्ये शहर तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते़; मात्र तडीपार असूनही शहरातील सिडकोमध्ये वावर असलेला घुसळे गुन्हेगारी कारवाया करीत होता़ उपेंद्रनगर परिसरात घुसळे आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या अधिकाऱ्यांनी त्यास अटक केली़ या प्रकरणी घुसळेवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़