सिडको, अंबड भागात संततधार

By Admin | Updated: July 3, 2016 23:46 IST2016-07-03T23:33:43+5:302016-07-03T23:46:07+5:30

सिडको, अंबड भागात संततधार

Cidco, Ambed region, Santhadhar | सिडको, अंबड भागात संततधार

सिडको, अंबड भागात संततधार

 सिडको : गेल्या काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे सिडको भागातील रस्त्यांवर तसेच उद्याने, मोकळ्या मैदानात पावसाचे पाणी साचल्याचे चित्र बघावयास मिळाले.
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. बाळगोपाळांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. पावसामुळे भाजीबाजारातील विक्रेते तसेच हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांचे हाल झाले. सिडकोतील मंगलमूर्ती मैदानात पावसाचे पाणी साचल्याने मैदानात लावण्यात आलेल्या खेळण्यादेखील पावसाच्या पाण्यात गेल्या आहे. मनपाच्या वतीने सिडको भागातील पावसाळी नाले तसेच गटारींची अद्यापही सफाई केली गेली नसल्यामुळे नाल्यांमध्ये घाण व कचरा दिसत आहे. गणेश चौक येथील विद्यानिकेत शाळेजवळील नाला हा साफ केल्याने नागरिकांच्या घरात शिरणारे पावसाचे पाणी यंदा मात्र शिरले नसल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाळासाहेब गिते यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Cidco, Ambed region, Santhadhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.